मिडीया
Ravindra Talpe

"जागतिक आदिवासी दिनानिमित्त रवींद्र तळपे विशेष पुरस्काराने सन्मानित."

पुणे, ९ ऑगस्ट २०१७: जागतिक आदिवासी दिनाचे औचित्त्य साधून आदिवासी क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तळपे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रिम कोर्टाचे जेष्ठ वकिल अ‍ॅड. मनोज गोरकेला व उत्तराखंडचे आमदार देशराज करणवाल ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्यावेळी व्यासपीठावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. तसेच ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, आय आय टी मुंबई व महाराष्ट्रातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने रवींद्र तळपे यांचा स्वतंत्र सत्कार करण्यात आला.

Ravindra Talpe

"आश्रमशाळांमधील उपाययोजनेबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन."

अहमदनगर : आदिवासी आश्रमशाळांमधील पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना पुरवाव्यात व आश्रमशाळेतील मृत्यूसंदर्भात नुकत्याच निर्गमित करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार कठोर उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे यांना देण्यात आले. हेच निवेदन समितीतील सदस्य असलेल्या जिल्हा पोलिस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देखील देण्यात आले आहे. यावेळी याचिकाकर्ते रवींद्र उमाकांत तळपे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Ravindra Talpe

"जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा."

पुणे, ९ ऑगस्ट २०१३: जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पुणे शहरातील विविध संघटनांच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावानुसार ९ ऑगस्ट १९९४ पासून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

Ravindra Talpe

"अस्सल हरहुन्नरी अवलिया (ठकाबाबा कृष्णा गांगड)."

अहमदनगर : आमचा बाबा काही साधासुधा नाही. वयाची अनेक दशके त्याने लोकरंजन केले आहे. जवळपास ८५ वर्षे वयोमान असलेला हा उत्साही तरुण ठकाबाबा कृष्णा गांगड म्हणजेच निसर्गाचा अदभूत खजिनाच. वाघ, सिंह, कोल्हा, कुत्रा, मांजर, बैल, गाय, म्हैस, पोपट, कावळा, कोकिळा, बकरी याबरोबरच अनेक प्राण्यांचे आवाज पाहण्याची सुवर्णसंधी असते.



Ravindra Talpe

"समाजाच्या पिछेहाटीस नेत्यांबरोबरच सुशिक्षित वर्गही जबाबदार."

नागपूर : शिक्षण, आरोग्य व रोजगार ह्या तीन्ही विषयांमध्ये आदिवासी समाजाची पिछेहाट झाली आहे. योग्य नेतृत्वाच्या अभावी हा समाज आज रसातळाला पोहोचला आहे. अशावेळी समाजातील सुशिक्षित वर्गाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आपण समाजाच्या नावाने सर्व सोयी-सुविधा उपभोगतो. मात्र गावातील दुर्बल समाजाला त्यातून काहीही परत करत नाही. समाजाचे देणे आवश्यक असूनही त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आदिवासी समाजाच्या पिछेहाट होण्यास राजकीय नेतृत्वाबरोबर सुशिक्षित समाज व अधिकारी-कर्मचारीही जबाबदार आहेत, असे मत आदिवासी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे ह्यांनी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Ravindra Talpe

"राज्यकर्त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचे उदाहरण नजरेसमोर ठेवा."

अहमदनगर : जनतेवर अत्याचार करणारांची राज्ये नेस्तनाभूत झालेली इतिहासाने अनेकदा पाहिली आहेत. जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले नेतेच आज लपून बसले आहेत. त्यामुळेच जनतेला स्वत:वरील अन्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. आज आमच्यावर अन्याय होत असताना तुम्ही भूमिगत झाला आहात. मात्र मते मागण्यासाठी तुम्हाला आमच्याकडेच यायचे आहे, तेव्हा जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा आदिवासी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे ह्यांनी राजूर येथे जाहिर निषेध मोर्चाला संबोधित करताना दिला.



Ravindra Talpe

"शाळेहून थोर नाही ते मंदिर."

दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. मात्र समृध्दी व आदिवासींचा काहीच संबंध नाही. आदिवासी भागातील चित्र वेगळेच आहे. एकीकडे आदिवासी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाठवत होते. तर दुसरीकडे गोरगरीब मिळेल त्यावर गुजराण करीत होते. असा विरोधाभास असलेले चित्र होते.

Ravindra Talpe

"याचसाठी केला होता का अट्टाहास ?"

आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक संचलित शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जवळे बाळेश्वर ह्या आश्रमशाळेला भॆट दिली. १ एप्रिल म्हणजेच एप्रिल फुलचा दिवस होता. आश्रमशाळॆतील कर्मचा-यांची सुट्टी होती. कारण रविवार होता. तसेच सलग जोडून चार दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे इकडे कुणीही फिरकणार नाही अशी आशा असावी.



Ravindra Talpe

"सामाजिक विकासासाठी समाजाचे परखड मूल्यमापन करा."

धुळे : जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींचा आंतरराष्ट्रीय गौरव दिन आहे. हा दिवस साजरा करीत असताना आपल्या समाजाच्या विकासासाठी संघटितपणे काम केले पाहिजे. समाजाचे परखड मूल्यमापन केले पाहिजे. स्पर्धेच्या युगात वावरताना आपले अस्तित्व राखून जल, जंगल, जमीन ह्यांची निष्ठेने सेवा केली पाहिजे. आपसातील वाद सामोपचाराने मिटवून सर्वांना विकासाच्या संधीत सामावून घेतले पाहिजे. समाजाच्या शाश्वत विकासासाठी आधीच्या पिढीने घालून दिलेली शिकवण सतत लक्षात ठेवली पाहिजे. अन्यथा आपण मानवी विनाशास कारणीभूत ठरणार आहोत असे मत आदिवासी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे ह्यांनी धुळे येथे बोलताना व्यक्त केले.

Ravindra Talpe

"आदिवासी ही एक प्राचिन परंपरा."

अहमदनगर : आदिवासी ही एक प्राचिन संस्कृती व परंपरा आहे. कोणत्याही धर्माचा उदय होण्यापूर्वीची ही संस्कृती आहे. त्यामुळेच या समाजाने इतर धर्माच्या परंपरांचा अवलंब करु नये. आपला संस्कार, परंपरा, धार्मिक विधी व उत्सव ह्यांचे जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याला आदिवासी हा बहुमान प्राप्त झाला आहे. जर आपल्या परंपरा व संस्कृती टिकली नाही तर आपले आदिवासीत्वच धोक्यात येईल असा इशारा आदिवासी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे ह्यांनी बारी, ता. अकोले जि. अहमदनगर येथे बोलताना समाजबांधवांना दिला.